Baramati Crime : मळद गावात लूटमार करणाऱ्या भोऱ्या जाधवला पोलिसांनी केले अटक ; न्यायालयाने दिली चार दिवसांनी पोलीस कोठडी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

एमआयडीसीत काम करून आपल्या मोटरसायकलीने घरी जात असताना,प्रदीप बाळू गायकवाड,वय.२६ वर्षे (रा.मळद,भैय्या वस्ती,बारामती) यांना मळदच्या दोन युवकांनी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत,पैसे दिले नाहीत म्हणून बेदम मारहाण केली.त्यानंतर मळद ग्रामपंचायतीसमोर गायकवाड यांना बेदम मारहाण करत, खिशातील १२०० रुपये काढून घेणाऱ्या संशयित आरोपी भोऱ्या उर्फ आकाश बाळासाहेब जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मळद भैय्यावस्ती येथे राहणारे प्रदीप जाधव हे एमआयडीसी मधून कामावरून घरी जात असताना, सुरज मदने व बबन आहिवळे यांनी दारू पिण्यासाठी पैस्यांची मागणी करत,पैसे दिले नाहीत म्हणून दोघांनी त्याला फायटरने मारहाण केली.पुढे गेल्यावर मळद ग्रामपंचायतीसमोर मळद गावातील रेकॉर्डवरील आरोपी भोऱ्या उर्फ आकाश जाधव व रविंद्र मदने यांनी अडवून पुन्हा बेदम मारहाण करत,त्यांच्या खिशातील १२०० रुपये काढून घेत दमदाटी केली.

या टोळीबद्दल यापूर्वीसुद्धा खूप लहान मोठ्या तक्रारी पोलिस ठाण्यात नाव न सांगण्याचे अटीवर पोलिसात येत असतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव याला तात्काळ अटक केली.या गुन्ह्यातील बाकीचे आरोपी फरार आहेत. आरोपी भोऱ्या जाधवला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.ही कारवाई बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील,पोलीस कर्मचारी दळवी,सहाय्यक पोलीस फौजदार जगदाळे कोळेकर यांनी केलेली आहे

बातमी कोट :

मळद गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव व त्याच्या साथीदारविषयी तक्रारी असतील त्या निर्भीडपणे लोकांनी पोलीस स्टेशनला द्याव्यात.नजीकच्या काळात त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई होणार आहे.

सुनील महाडिक ( पोलीस निरीक्षक )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *