बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आपल्या बारामतीकरांसाठी कचऱ्यातून उत्पन्न मिळण्यासाठी नगरपालिका व लुक्रो ग्रुप प्लास्टिकचा सर्व प्रकारचा कचरा विकत घेत आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागातून संकलन करीत आहोत.
नागरिक व महिला भगिनींना नम्र निवेदन घरा घरामध्ये आलेले प्लास्टिक वेगळे ठेवून नप च्या टीमला आपल्या परिसरात, आपल्या दुकानात,आपल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स व आपल्या सोसायटीमध्ये एकत्रितपणे देण्यासाठी फोन करून बोलवा.आमचे कर्मचारी नक्की येतील व आपला कचरा विकत घेऊन जातील.
तसेच प्लास्टिक कचरा घंटा गाडीत देणे बंद करून आपली बारामती प्लास्टिक मुक्त बनवण्यासाठी पर्यावरण दुत बनुयात.आपली बारामती प्लास्टिक मुक्त शहराचे मॉडेल देशात एक नंबर बनवूया.असे आवाहनही बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी बारामतीकरांना केले आहे.
आपल्या परिसरातील कचरा एकत्रितपणे देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा..
संपर्क : सचिन सर ( ८६००७००४६१ )