मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ जणांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह ११५ आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.त्याशिवाय अकोल्यातील अकोट सत्र न्यायालयानेदेखील सदावर्ते दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप असल्याने सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत.सदावर्तेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मात्र,शरद पवार यांच्या घरावरील हल्ला ही गंभीर घटना होती.यानंतर घटनेत कट रचल्या प्रकरणी सदावर्तेंना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह ११५ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्तेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सदावर्तेंना ५० हजारांच्या जातमुचक्यावर आणि तितक्याच रकमेच्या हमी रकेमवर जामीन मंजूर केला आहे. तर इतर ११५ आंदोलकांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.