Big Breaking : भीमा काळे मृत्यू प्रकरण पोलिसांना भोवल ; पोलीस निरीक्षकांसह सात जणांवर गुन्हा दाखल..!!


सोलापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पोलीस कोठडीत गुन्ह्याचा तपास करत असताना आजारी असलेल्या भीमा काळेचा उपचारादरम्यान सोलापुरातील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक,सहा.पोलीस निरीक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर सात जणांविरुद्ध वैद्यकीय मदत न पुरवता मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भा.द. वि कलम ३०४,३३०,१६६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहा.पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ,हवालदार श्रीरंग खांडेकर,पोलीस नाईक शिवानंद भीमदे,पोलीस नाईक अंबादास गड्डम,पोलीस शिपाई आतिश पाटील, पोलीस नाईक लक्ष्मण राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

भीमा काळे हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता. विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी २२ सप्टेंबर २०११ रोजी भीमा काळे याला कारागृहातून वर्ग करून ताब्यात घेतले होते.न्यायालयाने भीमाला २२ ते २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली हाेती.पोलीस कोठडीत असताना भीमा काळे याला सर्दी,ताप,खोकला आणि उलट्या होत होत्या.त्याच्या पायाला कशाचा तरी संसर्ग झाल्याने सूज आली होती.त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, उपचारादरम्यान त्याचा तीन ऑक्टोबरला मृत्यू झाला.

या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे मयत म्हणून नोंद करण्यात आली होती.पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत सहायक पोलीस निरीक्षकासह सहा जणांनी गुन्हा कबूल करण्यासाठी मारहाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणात आरोपी भीमा काळे याला गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीत मारहाण केल्याची फिर्याद दाखल आहे.या प्रकरणाचा तपास पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाचे पोलीस उपअधीक्षक जी.व्ही.दिघावकर करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *