Baramati News : कृषी मूल उद्योग शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांची एकमताने फेरनिवड..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फेरनिवड करण्यात आली. रविवारी (दि.१७) संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने अजित पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली. संस्थेच्या प्राथमिक,माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय असून दीड हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.८० शिक्षक अध्यापन करतात. संस्थेच्या वतीने आयटीआय सुरू करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा यामागे उद्देश आहे.

याशिवाय स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व इंग्रजी माध्यमाची शाळाही संस्थेच्या वतीने चालविली जाते. संस्थेची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष- दशरथराव धुमाळ,सचिव-प्रफुल्ल तावरे,खजिनदार- सुभाष सोमाणी,विश्वस्त- सुनेत्रा पवार,मिलिंद जगताप
नरेंद्र गुजराथी,सय्यद दस्तगीर,दत्तात्रय वाबळे,प्रीतम पहाडे आणि प्रणव सोमण यांची देखील नवीन कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *