बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
महाविकास आघाडी मधून बाहेर पडल्यानंतर पाहिल्यादांच हुंकार यात्रेच्या निमित्ताने इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथील पालखी मैदानात सभेत बोलताना राजू शेट्टी बोलत होते की,नाबार्डचा रिफायनरी देण्याचा विचार मनासुद्धा आणला नव्हता कारण तुम्हाला बँकेतील,कारखान्यातील, राज्य बँकेतील सगळी बगलबच्चे तुमचे होती ही बांडगूळ पोसण्यासाठी तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरलं.तुमच्यामध्ये आणि आमच्या मध्ये हेच मतभेद आहेत.
आमच्यासमोर आहे तो ऊस उत्पादक शेतकरी, काबाड कष्ट करणारा शेतकरी आणि तुमच्या समोर तुमचं राजकारण सुरक्षित करणारा बँकेतील, राज्य बँकेतील, कारखान्यातील बांडगुळ यामुळे यांना ईडीची भीती वाटते आम्हाला ईडीला भीती वाटत नाही.अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
पवार साहेब तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना आळशी म्हणाला याचा सगळ्यात जास्त राग मला आला.. कारण महाराष्ट्राची भरभराट याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांमुळे झाली आहे.. या महाराष्ट्रात अर्थकारण स्थिरस्थावर झाले आहे ते याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांमुळे झाले आहे यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना आळशी म्हणत असाल तर हे राजू शेट्टी खपून घेणार नाही असा गर्भित इशारा राजू शेट्टी यांनी शरद पवारांना दिला आहे.. ते इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते..