Baramati Crime : बारामतीतील महिलेच्या तक्रारीवरून पाच सावकारांच्या वर गुन्हा दाखल..आरोपींना चार दिवसांची कोठडी मंजूर..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

खासगी कंपनी सुरू करण्यासाठी खासगी सावकारांकडून पाच टक्के व्याजाने एक करोड नऊ लाख रुपये घेतले होते.अनेकदा व्याज देऊनही काही आर्थिक अडचणीमुळे व्याज देणे बाकी असताना, तक्रारदार महिलेच्या घरात जाऊन तिला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून व्याजासाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकार संजय प्रल्हाद बोरकर,पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा,दिलीप कोठारी ( रा. बारामती,जि.पुणे ) व अळणुरे साहेब परभणी यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४५२ ३५४,५०४, ५०६ तसेच सावकारी अधिनियम कलम ३९,४० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,वाशीम जिल्ह्यात बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू करण्यासाठी फिर्यादींच्या पतीने खासगी सावकारांकडून दर महिना पाच टक्के व्याजाने एक करोड नऊ लाख रुपये घेतले होते.कारखाना चालू असताना या घेतलेल्या मुदलेच्या रक्कमेच्या व्याजासहित परत केली आहे.परंतु दुर्दैवाने त्यांच्या कारखान्याला आग लागल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे बाकीची रक्कम ते परत देऊ शकले नाहीत.त्यामुळे आरोपींनी फिर्यादींनी व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली.

कंपनीच्या इन्शुरन्स पैसे मिळाल्यानंतर बाकीचे पैसे देतो.असे सांगितले असता सगळे आरोपी निघून गेले असता,संशयित आरोपी पोपट थोरात याने फिर्यादींना घरी जात महिलेला व्याजाच्या पैस्यांसाठी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे या होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादींनी फिर्याद दिली आहे.या प्रकारामुळे फिर्यादींचे पती अद्याप घरी आलेले नाही.याबाबत माहिती घेत पोलिसांनी संशयित आरोपी
पोपट थोरात व संजय बोरकर यांना अटक करत,कोर्टात हजर केले असता,न्यायालयान आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे करीत आहेत.

बातमी कोट :

सावकारीचा त्रास होत असेल त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करावी तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली जाईल कुणीही बेकायदेशीर सावकारांची भीती बाळगू नये.फक्त तक्राराची खातरजमा केली जाईल नंतरच दाखल होईल.

सुनील महाडिक ( बारामती शहर पोलीस निरीक्षक )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *