इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
कोरोनाच्या कालखंडानंतर दोन वर्षाने राज्यात १ मे रोजी ग्रामसभा होत आहेत.या सभेत शेतकऱ्यांनी दोन ठराव मंजूर करुन घ्यावेत.एक हमी भावाचा कायदा आम्हाला मंजूर करून द्यावा अशा अर्थाचा एक ठराव आणि शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी हा दुसरा ठराव मंजूर करून घ्यावा.हे दोन्ही ठराव घेऊन आम्ही राष्ट्रपतींना भेटून विनंती करणार आहोत या देशाच्या संसदेने आजपर्यंत हजारो कायदे केले ते सरकारच्या म्हणण्याप्रमाणे अगर लोकप्रतिनिधींच्या म्हणण्याप्रमाणे केले.
या देशातल्या शेतकऱ्यांनी प्रथमच गाव ठराव करुन पहिल्यांदाच माणगी केली त्यामुळे संसदेने तो मंजूर करुन आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यासोबत शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा दहा तास वीज घेण्यासंदर्भात दुसरा ठराव मुंबई उच्च न्यायालयात मी स्वतः दाखल करणार आहे असेही त्यांनी सांगितले.
कोळशाची जबाबदारी ही सरकारची जनतेची नाही : राजू शेट्टी…
कोळसा टंचाई ही राज्य सरकारची जबाबदारी असून ती जनतेची जबाबदारी नाही.समजा केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात पक्षपात करत आहे.ऊर्जा मंत्री हे मुख्यमंत्र्यां समोर जावून ही नैसर्गिक संपत्ती आम्हाला का मिळून देत नाही अशा पद्धतीची भुमिका मांडली पाहिजे. कोळशाची टंचाई आहे असे मी कधिच कुठे ऐकले नाही.याचा अर्थ सरकारचे नियोजन चुकले असून ते ढिसाळ आहे.मात्र याची सर्व सामान्य जनतेला का ? असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.