Pune Kidney Racket : पुण्यातील किडणी रॅकेट प्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससूनमधील प्रत्यारोपण समिती स्थगित करून ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.तावरे यांना निलंबित करण्यात आले. रूबी क्लिनिक हॉलच्या प्रत्यामरोपणाचा परवाना रद्द केला आहे.यावरून यातील पीडित महिलेला न्याय मिळाला का ? मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थने रुबी हॉल क्लिनिक व ससून रुग्णालय यांच्या विरुद्ध पुणे शिवाजी नगर न्यायालयात भा.द.वि कलम ३७० ३०७,४०९,४२०, ४६७,४६८,४७११२० (ब) व ३४ प्रमाणे गुन्हा घडला आहे.त्या संबधात सी.आर.पी.सी १५६(३) गुन्हा नोंद करून कारवाईचे आदेश करावे अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती.

यानुसार न्यायालयाने संबधित प्रकरणी प्राथमिक चौकशी करून ५ मे २०२२ पर्यंत न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत.सदर दावा मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे संचालक अण्णा जोगदंड यांच्या मागर्शनखाली संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,हरिभाऊ मंजुळे सामाजिक कर्यकर्ते अभिषेक हरिदास यांच्यावतीने न्यायालयात दाखल केला होता.शासनाने प्रत्यारोपण समिती स्थगित करून ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.तावरे यांच्यावर केलेली कारवाई यातूनच लोकसेवक या नात्याने त्यांच्याकडे असलेली हुकूमत व कायद्याने सोपवलेली जबाबदारी यांच्यात त्यांनी फौजदारी न्यास भंग केल्याचे स्पष्ट होत आहे.

तसेच शासनाने रूबी क्लिनिक हॉलच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केल्याने सदर रुग्णालयाची बनवेगिरी तसचे खोटे दस्तवेज तयार करणे व बनावट कागदपत्राच्या आधारे किडनी प्रत्यारोपण केले. सदर महिलेला पैसाचे अमिष दिले, किडनी दान करणाऱ्या महिलेच्या रक्तातील शुगरच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष करून किडनी-अवयव बदली करून त्यांचा मुत्यू घडू सशकतो याची जाणीव असताना हलगर्जी केल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेने यावर नमुद कलमाने यातील आरोपीचे चौकशीचे आदेश झालेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *