एफआरपी बाबत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक…
इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
राज्यातील साखर करखान्याच्या एफआरपी बाबत पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,इथेनाॅल सह इतर उपपदार्थ निर्मितीतून चांगला पैसा कारखान्यांना मिळाला आहे मात्र तरीही तोडणी वाहतुकीचा अवास्तव खर्च दाखवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक जात आहे.कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या कन्नड मधील कारखान्यास वाहतुकीसाठी एक हजार वीस रूपये खर्च दाखवतात.या खर्चात हेलिकॉप्टर ने ऊस आला असता असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक राजू शेट्टी यांनी केलाय.
नुकताच राजू शेट्टींनी महाविकास आघाडी ला रामराम ठोकून ते आता मैदानात उतरले आहेत याच मुद्द्यावरून जेव्हा राजू शेट्टींना आपण भाजपसोबत जाणार का ? असा सवाल विचारला असता कुबड्या घेण्याइतका मी दुबळा नाही अशा शब्दात एका वाक्यात राजू शेट्टी यांनी उत्तर दिलेय.राजू शेट्टी म्हणाले महा विकास आघाडी ही निवडणूकीनंतरची आघाडी असून शेतकऱ्यांना न्याय मिळल असे वाटत होते.प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची फरफटचं होत आहे.त्यामुळे महाविकास आघाडीशी संबंध तोडले आहेत.
याचा अर्थ दुसऱ्याला मिठी मारली असा होत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही चळवळीतील संघटना आहे. भाजपाकडे जायला आनंद नाही.तिन काळे कायदे रद्द करायाला आठशे शेतकऱ्यांचा बळी गेला.त्यांच्या काळात महागाई प्रचंड असून ऊसाची मशागत, रासायनिक खते,विद्राव्य खते यांचे दर वाढल्याने ऊस उत्पादकांना टनाला २१४ रूपये वाढले आहेत. त्यामुळे भाजपाच्या बाजूने जाण्यात रस नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.साखरेचे भाव चांगले असून तिची निर्यात ही झाली आहे.