Raju Shetti : पवारांच्या बालेकिल्ल्यात शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी रणशिंग फुंकणार…शेट्टी काय बोलणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी हे प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात येत आहेत.नीरा खोऱ्यातील भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे ही सभा पवारांचे एकेकाळचे समर्थक आणि सध्या ‘छत्रपती’च्या पदाधिकाऱ्यांबरोबर उभा दावा मांडलेले पृथ्वीराज जाचक यांनी आयोजित केली आहे.

त्यामुळे एफआरपीच्या मुद्यासह शेतकरी प्रश्नावर शेट्टी कोणता संदेश देतात, याकडे पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतक-यांचे सरकारला काही देण घेणे नाही.त्यांचे विविध प्रश्न साेडविण्यासाठी सरकारला रस नसल्याने इंदापूर तालुक्यातील भवानीनगर कारखान्याच्या सभेस एकत्रीत यावं असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक राजु शेट्टी यांनी केले आहे.माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर राज्यभर दौरे सुरू केले आहेत. राज्य सरकारने उसाच्या ‘एफआरपी’चे तुकडे पाडले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्याची शक्यता कमी आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटना असून त्या राज्यभर आवाज उठविणार आहेत. एकरकमी एफआरपी मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे.तसेच ते म्हणाले राज्यात विजेचा लपंडाव सुरु आहे.शेतक-यांना रात्रीची वीज दिली जात आहे आणि बाकी सगळ्या घटकांना २४ तास वीज मिळत आहे. शेतकऱ्याच्या वाट्याला केवळ आठ तास वीज दिली जात आहे.

त्यात पुन्हा साडे चार तास भारनियमन आणि साडे तीन तास मिळणारी खंडीत हाेते अशा तापलेल्या उन्हात शेतकऱ्यांनी शेती करायची कशी ? उभा ऊस वाळून चालला आहे.साखर कारखाने ऊस तोडायला तयार नाहीत.शेट्टी यांच्या सभेच्या नियोजनाची तयारी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून जाचक यांनी करण्यास सुरूवात केली आहे.राजू शेट्टी यांची आज सहा वाजता कारखान्याच्या पालखी मैदानावर जाहीर सभा होणार आहे.या सभेत ते महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे बारामती, इंदापूरचे लक्ष असणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *