बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
धनगर समाजाचे प्रबोधनकार, समाजसेवक,हिंगोलीचे मा.महेंद्र महाराज मस्के यांना संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी सतीश जाधव यांच्या कडून मारहाण झालेली असून,या मारहाणीचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड कडून जातीवाद खपवून घेणार नाही,अशी तंबी यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोनवलकर यांनी संभाजी ब्रिगेडला दिली आहे.त्यामुळे संभाजी ब्रिगेडला जोरदार जशास तसे उत्तर देण्याचा ईशारा देखील यशवंत ब्रिगेड करून संभाजी ब्रिगेडला देण्यात आलाय..