इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळावर राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मतदार संघ क्र.१४ मधून बिनविरोध निवड झाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. नियामक मंडळावर हर्षवर्धन पाटील हे पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या निवडणूक समितीचे चेअरमन व इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी हर्षवर्धन पाटील यांना मंगळवारी (दि.१९) पत्राद्वारे कळवून अभिनंदन केले आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यातील सहकार चळवळीतील प्रमुख व अभ्यासू नेते मानले जातात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगासंदर्भात संशोधन, विकास, तांत्रिक सहाय्य करणारी देशातील प्रमुख मोठी संस्था आहे.