Big Breaking : बारामती तालुक्यातील शिरसाई कालव्याची जलवाहिनी दुसऱ्यांदा फुटली ; लाखोलिटर पाणी वाया ? याला जबाबदार कोण ? संतप्त नागरिकांचा सवाल..!! 


शिर्सुफळ : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शिर्सुफळ येथील शिरसाई कालव्याची जलवाहीनी पुन्हा फुटली आसुन लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत आसुन याला जबाबदार कोण ? असा सवाल येथील नागरीक करत आहेत.एका वर्षात पाईपलाईन फुटण्याची ही दुसरी वेळ आहे.पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.या पाईप लाईन मधून साबळेवाडी,गाडीखेल,कारखेल,भगतवाडी या गावांमध्ये पाणी पुरवठा केला जातो.यावेळी त्याठिकाणी पाच पंप चालु होते.असे झगडे यांनी सांगितले.

मागील ८ महिण्यापूर्वी म्हेत्रे वस्ती येथे देखील पाईप लाईन फुटली होती,आणि त्यामुळे शेकडो लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले.प्रशासनाने पंचनामे करून देखील तेथील लोकांना भरपाई मिळाली नाही.तसेच आज (दि.१९) रोजी पंप हाऊस जवळ जलवाहिनी फुटल्याने मोठा आवाज झाला.या आवाजामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.तर या घटनेला जवाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी केला.

पंप हाऊस येथील झगडे ऑपरेटर यांनी ऐकून पाच पंप चालू होते ते बंद केले.भर उन्हाळ्यात पाईपलाईन फुटल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून,पाईपलाईन फुटण्यामागची कारणे शोधुन कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

बातमी कोट :

याबाबत जलसंपदा विभागाचे अधिकारी रंगनाथ भुजबळ यांच्याकडून माहिती घेतली असता,या पाइपलाइनचे कलर काम करण्यासाठी फुटलेल्या जागेवर होल पाडण्यात आले होते.कलर काम पूर्ण झाल्यावर होल हे संबधित कलम काम करणाऱ्या ठेकेदाराने व्यवस्थित होलला जॉईंट व्यवस्थित न दिल्याने पाईपलाईन फुटल्याची शक्यता आहे.

(पाईप लाईन फुटलेली समजले असता.या घटनास्थळी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतक-यांनी खंत व्यक्त केली आहे. )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *