वडगाव निंबाळकर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हददीत नीरा-बारामती रोडवर नाकाबंदी करून वाहने चेक करत असताना,शिक्रापूर येथील दाखल असलेल्या बुलेट चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी राम लक्ष्मण कु-हाडे,वय. ३० वर्षे,मुळ ( रा.मानगुत्ती,ता. हुकेरी,जि. बेळगाव कर्नाटक ) सध्या ( रा.धानोरे,ता.शिरूर,जि.पुणे) याला चोरीच्या तब्बल ८० हजारांच्या बुलेटसह वडगाव निंबाळकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलोसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,नीरा-बारामती रोडवर नाकाबंदी दरम्यान,पोलीस कर्मचारी दुचाकी अडवत चौकशी करीत होते,यावेळी एकजण बुलेट गाडीवरून बारामती कडुन निरा बाजुकडे जात असतांना,त्याला थांबवुन नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव राम कु-हाडे असे सांगितले असता,त्याच्याकडे असलेल्या एम.एच. १२ पी.एल ७६७६ या बुलेटची चौकशी केली असता,त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची अधिक चौकशी केली असता,त्याने बुलेट गाडीही पांढरेवस्ती,धानोरे ता.शिरूर जि.पुणे येथुन चोरी केल्याचे कबूल केले. वडगाव पोलिसांनी तात्काळ शिकापुर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.आरोपीला बुलेट गाडीसह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,सहा. फौजदार थोपटे,पोलीस हवालदार महेंद्र फणसे,पोलीस शिपाई महादेव साळुखे यांनी केलेली आहे.