Political Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत २२ एप्रिलपर्यंत वाढ..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आज विशेष न्‍यायालयाने 22 एप्रिल पर्यंत वाढ केली. दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मलिक यांना अटक केली होती.

त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्‍यात आली होती.यानंतरही सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.आता पुन्हा त्यांच्या कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली होती.आता पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्‍यात आली आहे.

मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाई विरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती.तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.यानंतर त्‍यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती.सरन्‍यायाधीशांनीही याप्रकरणी लवकर सुनावणी घेण्‍याचे आश्‍वासन दिले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *