इथून पुढे राज्यात प्रीपेड पध्दतीने वीजपुरवठा देणार..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडला,यावेळी अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यात वीजेची चणचण भासत असल्याने राज्याची मोठी चिंता वाढणार आहे.कोळशाची देखील टंचाई निर्माण झाल्याने आता परदेशातूनच कोळसा आयात करण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न आहे.उन्हाची तीव्रता वाढल्याने वीजेचा भारही वाढला आहे.मागणी वाढली आहे.बाहेरील राज्यातून वीज घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाणी वीजेसाठी वापरणार आहोत. दुसरीकडे,तुम्ही वापरत असलेल्या वीजेचे बील भरले पाहिजे,असे ते म्हणाले. माळेगावमध्ये वीजेचे माळ सुरू होती. हायमास्टही चालू होता.पण आता हायमास्टला बंदी घातली आहे.राज्यात काही ठिकाणी दिवसाही दिवे चालू ठेवतात. त्याचे पऱिणाम भोगावे लागतात, असे ते म्हणाले.
राज्यातील जनतेला लवकरच “प्रिपेड पद्धतीने वीज देणार”
यावेळी अजित पवार म्हणाले की,आता लवकरच तुम्ही जस मोबाईल चालवत असताना प्रीपेड मोबाईलच कार्ड घेता,मोबाईल रिचार्ज संपला की कार्ड बंद पडतं.तशा पद्धतीने आता लाईटला देखील सुरुवात करणार आहे. त्यामुळे जेवढी रक्कम शिल्लक असेल कार्ड आणि घाला अन जेवढी वीज वापरा. वीज संपली की तुमची लाईट बंद. त्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार गरज असेल तस मिळेल तस कार्ड घेऊन यायचं ते लावायचं. त्यामुळे आता आकडा बंद म्हणजे बंदच..कारण आता आकडा टाकू टाकू आमची आता वाटच लागली.त्याच्यामध्ये अडचणी यायला लागलेल्या आहेत.
त्यामुळे आता चांगल्या सुविधा पाहिजे असतील तर आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल.असे देखील अजित पवारांनी आवर्जून सांगितले.आपल्याला काही गोष्टींमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये जो वीज बिल भरतो,जे भरत नाही त्यालाही फटका बसता कामा नये.कारण जे बिल भरत नाहीत त्यांचा भर वीज भरणाऱ्यावर भार पडतो.त्यामुळे ज्यांनी कर्ज फेडले ते शहाणे निघाले,ज्यांनी कर्ज फेडले ते मूर्ख निघाले कारण आमचं माफच झालं नाही.म्हणून त्यांच्या करता ५० हजारांचे पीक कर्ज देण्याचे सुरू केले आहे.