Social News : संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांचे शिक्षण द्यावे : केंद्रीयमंत्री रामदास आठवले


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करून संविधानिक मूल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
नवी मुंबईच्या खारघर येथील एन एम.आय.एम.एस या मॅनेजमेंट कॉलेजच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले बोलत होते.

विद्यार्थ्यांना एमबीएची पदवी रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.एन.एम.आय.एम.एसचे संस्थापक अमरीशभाई पटेल आपले चांगले स्नेही असल्याचे सांगत एन.एम आय.एम.एस चांगले शिक्षण संकुल असल्याचे कौतुक केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *