बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीत विविध विकासकामांचा आढावा आणि बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,महाराष्ट्रातील सगळ्या पत्रकारांना मी वारंवार सांगितले आहे की हा असा म्हणाला तो तसा म्हणाला.यापेक्षा मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो,त्याविषयी कामाचं बोला.तसेच बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन्स याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता,मी पुरंदरे यांच्याबाबत कुठलेही वक्तव्य केलं नाही त्यामुळे पत्रकारांनी माझ्या नावावर विनाकारण पावती पडू नये.आणि कुणाचं काय आहे त्यात लक्ष देण्याच्या पेक्षा कायद्याने नियमांच्या ज्या गोष्टींमध्ये जो चुकीचं वागत असेल तर त्याला सोडणार नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांना चांगलेच फैलावर घेतले.
आर.आर पाटील गृहमंत्री असताना जेम्स लेन्स यांचा विषय निघाला होता याबाबत मला पत्रकार बांधवांना आणि राजकीय नेते मंडळींना सांगायच आहे राज्यात आणि देशात महत्वाचे प्रश्न काय आहेत यालाच महत्त्व दिले पाहिजे बाकीच्या गोष्टींना महत्त्व देऊ नका,उगाच लोकांना जुन्या विषयात घेऊन लोकांच्या भावना दुखावतील असे काम करू नये.तसेच तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे असे देखील पवारांनी आवर्जून सांगितले.