Political News : भाजप आमदारावर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक अडचणीत सापडले आहे.एका महिलेनं जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेकडून गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील २७ वर्ष गणेश नाईकांचं महिलेसोबत लिव्ह ॲंन्ड रिलेशनशीप होते.२७ वर्ष संबंध असल्याचा महिलेने आरोप केला आहे.

एवढंच नाहीतर लिव्ह ॲंड रिलेशनशीपमधून झालेल्या मुलाला गणेश नाईकांनी स्वीकारण्यास नकार देत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा महिलेनं गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाहीतर मार्ग २०२१ मध्ये गणेश नाईक यांनी सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी गणेश नाईक यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.अशी तक्रार या महिलेनं दिली आहे.

या महिलेनं नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.तसंच नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.परंतु,त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही.त्यामुळे पीडित महिलेनं महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी,अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.तर,गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करावी अशी मागणीच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *