Indapur News : पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ह्या २०२१ च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इस्माच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्या,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांना २०२१ च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अंकिता पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.शनिवारी ( दि.१६ एप्रिल ) रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे.

एक अतिशय कर्तृत्ववान,दानशूर, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अंकिता पाटील ठाकरे यांना प्राप्त झाला असून या पुरस्काराने अजुन उत्स्फुर्तपणे काम करण्यासाठी प्रेरणा व एक जबाबदारी प्राप्त झाली आहे. या पुरस्कारासाठी सागा फाऊंडेशन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार देखील मानले ही माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वरून पोस्ट करत माहिती दिली. या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व विविध क्षेत्रातील मान्यवर या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *