बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक : विकास कोकरे )
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान जयंतीचे औचित्य साधत,हनुमान चालीसा लावत भोंगे वाजवले आहेत.आणि याच पार्श्वभूमीवर बारामतीत देखील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड सुधीर पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याजवळच असलेल्या पाणवठा वेस मारुती मंदिरात आरती करत स्तोत्र पठण केले.आणि त्यानंतर भोंगे लावत भोंग्यावर हनुमान चालीसा वाजविण्यात आली.
शिवतीर्थवर झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले होते.आणि त्याच्या पुनर्विचार उत्तर सभेत देखील त्यांनी केला होता.यामुळे मनसेचे कार्यकर्ते बारामतीत राज ठाकरेंच्या आज्ञेचे पालन करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला असताना मात्र, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बारामतीत सामाजिक सलोखा गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळते.हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा लावण्यात आली आहे.यातून कोणताही तणाव निर्माण करण्याचा उद्देश नाही,असेही मनसेचे प्रदेशउपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्रीमारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर,तालुका अध्यक्ष ॲड. निलेश वाबळे,शहर उपाध्यक्ष स्वप्नील मोरे,प्रविण धनराळे,अमोल गालिंदे,ॲड.भार्गव पाटसकर,विकास पेटकर,ओंकार महाडिक व इतर भाविक उपस्थित होते.