Crime News : बैलगाडा शर्यत पडली महागात ; ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोजकांसह २० जणांवर गुन्हा दाखल..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

फलटण तालुक्यातील पवारवाडी गावाच्या जोतिर्लिंग यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन होते.या शर्यती पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्यासाठी आयोजकांनी दिल्याने शाब्दीक चकमक करत असताना,धक्काबुक्की झाल्याने सार्वजनिक शांतता बिघडवल्याप्रकरणी संशयित आरोपी नितीन जगन्ना वरे,सुहास पवार विकास ज्ञानदेव वरे,चंद्रकांत दत्तात्रय पवार,अजित पोपट हजारे,राजेंद्र भानुदास पवार, सुधीर मारुती पवार,राहुल जगन्नाथ वरे,धनराज बाळासो पवार,वैभव महादेव पवार, चांगदेव वसंत चव्हाण,गणेश संभाजी चव्हाण,शिवाजी रामचंद्र कदम,बाळु सोपान जगदाळे,राजेंद्र संपत चव्हाण,तानाजी मधुकर गुरव, दत्तात्रय भाऊसो गावडे,किशोर भगवान भोसले,बाळासो नारायण यादव, हनुमंत महादेव खारतोडे सर्वजण ( रा. पवारवाडी,ता. फलटण,जि.पुणे ) आयोजकासह तब्बल वीस जणांवर भा.द.वि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,पवारवाडी गावच्या जोतिर्लिंग यात्रेनिमित्त सदाशिव मोहिते यांचे शेतजमीनीमध्ये नितीन वरे व त्यांच्या इतर सहका-यांनी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते.बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनी रितसर परवानगी घेतल्याने फलटणच्या नायब तहसिलदार दिपाली बोबडे,आसू मंडलाधिकारी कोकरे व चालक भिसे हे देखिल बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित होते.बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या लोकांपैकी एकाला त्याच्या नातेवाईकांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्यासाठी आयोजकानी नकार दिल्याने त्या दोघांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली.

त्यातूनच वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याने सार्वजनिक शांतता बिघडत गेल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली.आणि आयोजकासह तब्बल वीज जणांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तब्बल वीस जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,सी.आर.पी.सी ४१ अ (१) प्रमाणे नोटिसा देऊन सोडण्यात आले आहे.या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस फौजदार एस.एस.सुर्यवंशी हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *