वडगाव निंबाळकर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय ! “जुगारी” समजत राष्ट्रवादीच्या दूध संघाच्या संचालकांला धक्काबुक्की करत जयंतीच्या वर्गणीचे पैसे काढून घेतल्याचा संचालकांचा आरोप..!!


मोरगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘मोरगाव’ येथे “जुगारी” समजून चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे दूध संघाचे संचालक असलेल्या अरविंद गायकवाड यांना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सुपा पोलीस मदत केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क ” अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप दूध संघाचे संचालक अरविंद गायकवाड यांनी केला आहे. आणि हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर ? जयंतीच्या निमित्ताने वर्गणी म्हणून गोळा केलेले ८ हजार १०० रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले.यामुळे आता चोर सोडुन संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार घडल्याने वडगांव-निंबाळकर पोलीस प्रशासन यामुळे चांगलंच चर्चेत आले आहेत.

अरविंद गायकवाड हे गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे संचालक पदावर तसेच बारामती तालुका सहकारी दूध संघात विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत.गायकवाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी बारामतीकडे जाण्यासाठी निघाले असता,घरापासून जवळच शॉपिंग सेंटर समोर थांबले असता,यावेळी वडगाव- निंबाळकर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सुपा पोलिस मदत केंद्रातील पोलीस कर्मचारी अक्षय सिताप,साळुंखे,ताडगे हे
तिघे आले आणि गायकवाड यांच्या शर्टाची कॉलर धरून, त्यांचा मोबाईल हिसकावून घेत,अर्वाच्च भाषा वापरत पोलीस मदत केंद्रात घेऊन गेले.आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी केलेली ८१०० रुपयांची वर्गणी काढून घेत,तुला काय करायचं आहे ते कर,आणि बघतो तुला नंतर अशी धमकी देखील दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर सुपा मोरगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी गायकवाड यांना अरेरावीची भाषा वापरत,”तुझ्या कपाळावर लिहले आहे का ? की तू चांगला आहेस,”जे झाले आहे ते सोडून दे” नाहीतर आमची कुठेही तक्रार कर आम्हाला काही फरक पडत नाही.हा आमचा रोजचा धंदा आहे हा…साहेब नक्की काय धंदा आहे रोजचा तुमचा ? असा प्रश्न आता मोरगाव मधील जनतेकडून विचारला जात आहे.

जुगार,मटका व अवैध दारू विक्रीसाठी नेहमीच विरोध करणारा ठामपणे भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून संचालक गायकवाड यांची ख्याती आहे.आज येथे पोलिसांनी केलेल्या गैर कृत्याबद्दल सर्व समाज स्थरातून संताप व्यक्त होत आहे.मोरगाव येथील या घटनेत सहभागी असलेल्या पोलीस शेख उपनिरीक्षक व कारवाईच्या दिखाव्यासाठी आलेले चार कर्मचारी यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करा यासाठी ग्रामस्थ संतप्त यानंतर रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांना प्रत्यक्ष भेटले.निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केले आहे.तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटून या गोष्टीची माहिती देणार असून,रास्ता रोको करणार असल्याची माहिती देखील गायकवाड यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *