बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरांत घरफोडीचे प्रमाण वाढल्याने,या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहा. पोलीस निरीक्षक उमेश दंडीले,सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांना सांगितले असता,त्यांनी एक
तपास पथक तयार करून या गुन्ह्याचा अभ्यास करून शेजारील जिल्ह्यातील आरोपींची माहिती घेतली असता संशयित आरोपी लोकेश रावसाहेब सुतार,वय.२८ वर्षे ( रा.लिंगनूर,ता. मिरज,जि. सांगली ) हा कळंबा कोल्हापूर येथील जेलमध्ये असून,तो अशाच प्रकारच्या गुन्ह्यात पटाईत व घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी असल्याने शहर पोलिसांनी ताबा वारंटने त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी त्याची अधिक चौकशी करत तपास केला असता,या आरोपीने केलेल्या घरफोड्या ह्या साथीदार संदीप यशवंत पाटील (रा.लिंगनूर,ता.मिरज, जि.सांगली) याच्यासह केल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून आरोपीकडून तब्बल १७७ ग्रॅम असे १७ तोळे आणि सात ग्रॅम सात लाख २० हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
या गुन्ह्याचा शोध लागल्याने बारामती शहरात गेल्या चार महिन्यापासून घरफोडी झालेली नसून,त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस ठाण्याला “बेस्ट रिकव्हरी ऑफ द मंथ”ह्या पुरस्काराने सन्मानित केले असून,त्यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देत अभिनंदन केले असून,या कामगिरीत बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहा. पोलीस निरीक्षक उमेश दंडीले,पोलीस कर्मचारी बंडू कोठे,कल्याण खांडेकर,दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण, देवकर यांचा समावेश आहे.