मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय जनता पक्षाचे नेते,माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.”ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करणार असं म्हणत किरीट सोमय्या हे काही कागदपत्रे घेऊन दिल्लीत दाखल झाले होते.
त्यानंतर मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित ठाण्यातील मालमत्ताही जप्त झाली. त्यानंतर आज किरीट सोमय्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत नवा बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत.
किरीट सोमय्या यांनी म्हटलं,१५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे.त्यामुळे किरीट सोमय्या या पत्रकार परिषदेत कुठला घोटाळा बाहेर काढतात यामुळे आता याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.