Baramati News : झारगडवाडीत जनावरांचा चारा घेऊन चाललेल्या ट्रॅक्टर चा अपघात.. अपघातात एक जण गंभीर जखमी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील जाधव वस्तीकडे जाणाऱ्या ३० फाट्यावर असणाऱ्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली चा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकासह एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर डोर्लेवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.जनावरांना चारा घेऊन येत असताना पुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला,नशीब बलवत्तर म्हणून यात दोन जणांचे प्राण वाचलेत..

सविस्तर माहिती अशी झारगडवाडी येथील ट्रॅक्टर चालक महेश नानासो मासाळ हा जाधव वस्ती येथून जनावरांचा चारा घेऊन घराकडे येत असताना ३० फाट्यावर असलेल्या पुलावरून वळण घेताना वळणाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर, ट्रॉलीसह ३० फाट्यात पडली. यामध्ये महेश नानासो मासाळ हा गंभीर जखमी झाला आहे.

त्याच्या डोक्याला मार लागला असून त्याला गावातील युवकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. जाधव वस्ती येथील ३० फाट्यावर असलेल्या पुलाला कठडे नसल्याने हा अपघात झाला आहे, यामुळे जलसंपदा विभागाने त्वरित ३० फाट्यावरील सर्वच पुलावर कठडे बांधावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *