गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत केलं शालेय साहित्याचे वाटप..!!


बारामती : सहसंपादक भास्कर दामोदरे

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीदिनाचे औचित्य साधत सोमवारी ( दि.११ ) तब्बल ८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे या हेतूने या कार्यक्रम राबविण्यात आला होता.

या कार्यक्रमाला छत्रपती जन्मोत्सव समिती बारामती संविधान युवा प्रतिष्ठान,समता परिषद,समीर बनकर, नवनाथ बल्लाळ,उत्तम धोत्रे,पिंटू गायकवाड,Dk gruop, राकेश वाल्मिकी,केतन गार्डी,ज्ञानेश्वर जगताप,अजित कांबळे,सुमित रेड्डे,मयुर कांबळे,अक्षय शेलार, अविनाश माने,चंद्रशेखर गाढवे, इजाज खान,चंद्रकांत बिस्ट, स्वन्नील इंगुले,अजित यादव,अजय नागे,विजय जगताप, अभिजीत कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.

दया दामोदरे,सिध्दार्थ सोनवणे,चंद्रकांत माने अभिलाष बनसोडे,भास्कर दामोदरे,अनिकेत मोहिते,विनय दामोदरे, अनिकेत साळवे, मंगलदास निकाळजे,तिरंगा पंडित या सर्वांनी परिश्रम घेतले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *