Indapur Crime : इंदापुरात काळया बाजारातील रेशनिंगचा तब्बल साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त ;तिघांवर गुन्हा दाखल..!!


इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क…

शासकीय रेशनिंगच्या दुकानातील जीवनावश्यक धान्याची बेकायदेशीर व अवैधरित्या साठा करून अपहार करीत असताना महसूल कर्मचारी आणि पोलीस पथकाने कारवाई करत तब्बल ६२,०००/- रू किंमतीच्या एकुण ६२ गोण्यात ३१०० किलो गहु आणि ४ लाख रूपये किंमतीचा महिंद्रा बोलोरो कंपनीचा पिकअप क्रमांक एम.एच.४२ एम ७०३३ व साडे सात हजारांची स्वस्त धान्य दुकानात कमी आढळून आलेला अंदाजे असा एकूण ४ लाख ६९ हजार ३५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पुरवठा निरीक्षक संतोष निशीकांत अनगरे वय.४६ वर्षे ( रा.जोशी गल्ली,इंदापूर ) यांनी फिर्याद दिली असून,याप्रकरणी मयुर अशोक चिखले वय.३२ वर्षे अतुल सोमनाथ होणराव वय.४९ वर्षे व वत्सला भानुदास शिंदे यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०,४०६,४०९,३४ जिवनावश्यक वस्तु कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,निमगाव केतकी इंदापूर रोडने महिंद्रा पिक अप क्रमांक एम ४२ एम ७०३३ ही संशयीत असल्याची माहिती इंदापूरचे तहसीलदार पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती,त्यानुसार तहसीलदार व पोलीस इंदापूर पथकास निमगांव केतकी कडे मार्गस्थ असताना अकलुज बायपास ब्रिज खालुन एक महिंद्रा पिक अप जात असता दिसून आला.पिकअप चालकाला चाहुल लागताच ते पिकअप कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथील गेटवरून आत गेले.त्यावेळी त्यास थांबवुन सदर पिकअप मधील चालकास विचारणा केली,संबंधित मालाचे अनुशंगाने कागदपत्राचे चौकशी केली असता पीकअप चालकाने कागदपत्रे दाखवण्यास असमर्थता दाखवली व असमाधानकारक उत्तर दिले.

या पीकअपची पाहणी केली असता सदर पिकअप गहु धान्याने भरलेले आढळून आले.त्यानंतर सदर वाहन इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पिकअप मधील अवैध गहु धान्याची चौकशी होवून त्या धान्याचा पंचनामा करत कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार पाटील यांनी दिले.त्यानुसार वाहनाचा पंचनामा केला असून त्यामध्ये ६२ गव्हाच्या गोण्या आढळून आल्या त्यामध्ये प्रत्येकी ५० किलो अंदाजे वजनाच्या अशा एकूण ३ हजार १००/- किलो गहु अंदाजे मिळुन आला.

याबाबत मयत रुक्मिणी होनराव यांचे दुकान संशयित आरोपी अतुल चालवत होते.मयाताचे दुकान वत्सला शिंदे यांच्या दुकानास जोडलेले होते.परंतु वत्सला शिंदे यांचे दुकान अपुरे असल्याने आरोपी अतुल होनराव हा शिंदे यांच्या दुकानाचे बेकायदेशीररित्या कामकाज पाहत होता.नायब तहसीलदार व मंडल अधिकारी शहाजी राखुंडे यांनी पंचनामा केला.इंदापूर तहसील कार्यालय व इंदापूर पोलीस ठाण्याकडून अवैधरित्या शासकीय धान्य विक्रीस चाललेल्या पिकअपवरती संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.याबाबत ऑनलाईन कार्यालयीन अभिलेख तपासणी केला असता पुस्तकी शिल्लक व व प्रत्यक्ष शिल्लक धान्य यामध्ये तफावत आढळली असल्याने दंडात्मक कारवाईची माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर साहेब यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *