बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ मंगळवारी (दि.१२) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमणार आहेत.बारामतीत १२ एप्रिल रोजी एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून शरद पवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.वेळ पडली तर घरात घुसून मारू आणि दोन पायावर नीट जाऊ देणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेला असल्यामुळे
बारामतीत मंगळवारी नेमके काय नाट्य घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही तयारी केली आहे बारामतीत आंदोलन होण्याची शक्यता धूसर असली तरीही कोणताही धोका पत्करायचा नाही असे पोलिसांनी ठरवले असल्यामुळे उद्या गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मात्र शरद पवारांच्या निवासस्थानी एकत्रित येण्याचे आवाहन मात्र सोशल मीडियातून जोरदार सुरू आहे,त्यामूळे आता गोविंद बागेसमोर प्रचंड गर्दी होणार ते देखील तितकच सत्य नाकारता येणार नाही.यामुळे पोलीस प्रशासनाची फार मोठी पंचाईत होणार हे देखील पाहायला मिळणार आहे.