इंदापूर : प्रमोद साबळे (उपसंपादक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसोबावाडी येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीला शाळेतील लेझीम पथकाने आणखी शोभा आणली. शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.त्यानंतर प्रवेश पात्र बालकांचे औक्षण करण्यात आले.
सेल्फी पॉईंट,फुलांची नावे मुलांना,विद्यार्थ्यांचे औक्षण विविध स्टॉल वरून विकास पत्र भरून आणि आणि माता पालकांना साहित्य वाटप करण्यात आले.शाळेतील सर्व मुलांना गोड जेवण देण्यात आले.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,म्हसोबावाडी ग्रामपंचायतीचे सरपंच,ज्येष्ठ नागरिक,पालक आदी उपस्थित होते.इंदापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी केंद्रप्रमुख दिलीप बोरकर,विषय तज्ञ पाडुळे सर यांनी श्रीमती पाठक मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद यांना कौतुकाची थाप दिली.
शाळेचे विशेष कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी होण्यामागे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक श्रीमती बबीता पाठक मॅडम शाळेतील शिक्षिका श्रीमती लीना कुंभार, श्रीमती चंदा वनवे, शिक्षक संजय वनवे, ज्ञानेश्वर वनवे,ऋतुराज साळी आणि आणि विनोद मुसमुसे तसेच मातापालक, ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग होता.गावचे सरपंच रूपाली खंडाळे,पोलीस पाटील तुषार झेंडे पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष लालासो साळुंखे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासो चांदगुडे,उपाध्यक्ष संदीप चांदगुडे, ग्रामपंचायत सदस्य अजित पवार,सुनील खंडाळे इत्यादी उपस्थित होते.