मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला चढवला होता.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली होती. तिचा कालावधी आज संपल्याने सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टात न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयान सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात शुक्रवारी किल्ला कोर्टाने इतर १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर त्यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर इतर १०९ आंदोलनकर्त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज त्याचा कालावधी संपत असल्याने पोलिसांना सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर केले त्यावेळी कोर्टाने सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.