महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या पॅनलविरोधात माधुरी चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.त्याचा राग मनात धरुन सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास दिला,अशी तक्रार माधुरी यांनी केली होती.तसंच,१९ जुलै रोजी धस आणि त्यांच्या समर्थकांनी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड केली,असा आरोप सुरेश धस यांच्यावर आहे.आठ महिन्यांपूर्वी धस यांच्यासह ३८ जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.याच अनुषंगाने भाजप आमदार सुरेश धस यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे.
सुरेश धस यांच्यासह ३८ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जुन्या दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम ३९५ वाढवण्याचे आदेश झाले असून,यामुळे सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.माधुरी चौधरी यांचे पती,मनोज चौधरी यांनी धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले,अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती.त्यावरून आष्टी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १४३,१४७,१४८,१४९,४२७, ३३६,३७९ या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली. ₹त्यांनतर आता कलमांत वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले असून,यात दरोडा ३९५ , बेकायदा घरात घुसने ४४८, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे ४५३,यासह शांतता भंग करणे आणि इतर ३४१,५०४ ,५०६ ही कलमे वाढणार आहेत. यामुळे आता माजी मंत्री आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे.