बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्य पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप व शिवसेनेत कुरघोड्या आणि स्थानिक पातळीवरही एकमेकांचे राजकारण सुरू आहे.असे असताना बारामती येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदीर परिसरात श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटात पार पाडला.रामनवमीचे औचित्य साधूत बारामती शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.रामनवमी निमित्त बारामती शहरातल्या श्रीराम मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
आज दिवसभर श्रीरामांचा दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.संध्याकाळी श्रीरामांच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी हजारो भक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते.बारामती शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन निघालेल्या फेरीचा गुणवडी चौकातील हनुमान मंदिर या ठिकाणी समारोप झाला.संध्याकाळी साडे सातच्या सुमारास पुन्हा प्रभू श्रीराम चंद्र यांच्या पुतळ्याची सजविलेल्या रथातून मिरवणूक निघाली. हजारो रामभक्तांच्या गर्दीत ही शोभायात्रा शहरभरातून निघाली.
रामनामाच्या घोषणांनी व गितांनी अख्खे बारामती शहर दणानून गेले.दरम्यान,शोभा यात्रा सुरु होताना श्रीराम मंदीर येथे आरती झाली.शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, त्यांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवले असा आरोप देखील आता श्रीराम भक्तांकडून वाढला आहे. अशा नेहमीच्या विरोधाच्या चित्राला श्रीराम जन्मोत्सवाच्या सोहळ्याने वेगळेपण दिले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळ्या निमित्त रविवारी शहरामधुन भव्य फेरी निघाली.गळ्यात भगवे गमजे व हाती भगवे ध्वज घेतलेल्या दुचाकीवरील रामभक्तांनी प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणा दिल्या.