बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवनगर शिवतीर्थ मंगल कार्यालयात तालुका पोलिसांनी आयोजित केलेल्या ग्राम सुरक्षा दलाची स्थापना आणि त्यांना सुरक्षा किटचे वाटप समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते,त्यावेळी ते म्हणाले की,ग्राम सुरक्षा दलात समाविष्ट झालेल्या सर्व युवकांचे अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो.. पण हे लक्षात घ्या तुम्ही ग्राम सुरक्षा दलामध्ये काम करताय आपल्या हातात कायदा दिलेला नाही.. नाहीतर उद्या पोलीस समजून एखाद्याला बदडून काढाल..
त्यामुळे तुम्हाला अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार आणि त्या नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कायदा वापरण्याचा प्रयत्न करू नका.मी हात जोडून सांगतो,नाहीतर पुन्हा म्हणाल दादा काय राव तुम्ही उद्घाटनाला आला आणि माझ्याच माग कायतरी लागलंय.. तस माग काही लागण्याच चुकीचं काय करू नका…तुम्ही योग्य पद्धतीने वागा..तुमच्या वरची जबाबदारी मोठ्या इमानीने पार पाडा.असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ग्राम सुरक्षा दलातील युवकांना दिला.