Political Breaking : अजित पवारांचा प्रश्न, ग्रामस्थांची पंचायतची लोकसंख्या किती ? आणि अजित पवारांनी मारला मग डोक्याला हात..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील सुपा परगाना मधील विकास कामांचा आढावा व काही ठिकाणी उद्घाटन समारंभवेळी सभेत, अजित पवार बोलत होते.सुप्याला मी नगरपंचायत करू शकतो परंतु आपली ग्रामपंचायत आहे तर आपली ही अवस्था तर नगरपंचायत केल्यावर नियम फार कडक असतात.यावेळी पवार म्हणाले मी माळेगाव नगरपंचायत केली,त्यामुळे सुपेकर यांची इच्छा असेल तर मी सुप्याला देखील नगरपंचायत करू शकतो परंतु पुन्हा माझ्या नावाने ओरडायचे नाही.असे देखील अजित पवारांनी सुपेकरांना सुनावले.

सुप्याची २०११ ची लोकसंख्या किती आहे ? हा प्रश्न विचारल्यावर वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे मिळाल्यानंतर मिश्कीलपणे अजित पवार म्हणाले की, आपल्यातल्या आपल्यात वाद चाललाय असे म्हणत “आता मी काय करतो साहेबांना पण बोलावतो,”सुप्रियाला पण बोलतो मी तिकडून वढाण्याने सुरुवात करतो, साहेबांना सांगतो तुम्ही चौफुल्यापासून सुरुवात करा आणि “सुप्रियाला सांगतो तू मोरगाव कडून ये“असं म्हणताच सभेत एकच हशा पिकला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *