बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी,आणि पैसे नाही दिले तर,विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल १ लाखांची मागणी करत,५० हजारापर्यंत तोडजोड करण्याची भूमिका दाखवत तडजोडीअंती पंधरा हजारांची लाच स्वीकारताना तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला आणि एका खासगी दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे.ही कारवाई रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आलेली आहे.
विलास अशोक धोत्रे ( वय.३४ )आणि हृषीकेश नंदकुमार पतंगे ( वय.२४ ) असे लाच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे आणि खासगी दलालाचे नाव आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनूसार तक्रारदार याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज आला होता.तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि पैसे दिले नाहीतर, विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, तडजोडीअंती वीस हजारांच्या लाचेची मागणी करत,पंधरा हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी लाचलुचपत पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर,पोलीस हवालदार मुकुंद अयाचित,पोलीस नाईक किरण चिमटे,चालक दामोदर जाधव,चालक पोलीस कर्मचारी दिपक दिवेकर यांच्या पथकाने केलेली आहे.