बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल १०० ते १५० एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे दगडफेक आणि चप्पल फेक करत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.आणि याच अनुषंगाने कालपासून राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शरद पवारांच्या समर्थनात निषेध आंदोलन करीत आहेत. आणि याच अनुषंगाने बारामतीत देखील आज शरद पवारांच्या घराच्या बाहेर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहर पोलीस ठाण्याच्या जवळ सदावर्ते आणि हल्ला केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा जाहीर सभा घेत निषेध आंदोलन करण्यात आले.
पवार साहेब तुम आगे बडो,हम तुम्हारे साथ..है,अजित दादा तुम आगे बडो..हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सिल्व्हर ओक या ठिकाणच्या हल्ल्यामागील नक्की मास्टर माईंड कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे ? असा प्रश्न बारामती मधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.हा हल्ला पूर्वनियोजित होता असा आरोप देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात केला.यावेळी पोलीस प्रशासनाला निवेदन देत भ्याड हल्ला केलेल्यांवर आणि सदावर्ते यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देत करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी शहराध्यक्ष सुभाष ढोले, माळेगाव सहकारी कारखान्याचे संचालक मदन देवकाते,संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण तावरे,जिल्हा नियोजन दक्षता समिती सदस्य साधू बल्लाळ,बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे,बारामतीच्या नगरसेविका आरती शेंडगे,कृषी बाजार समिती माजी अध्यक्ष रमेश गोफणे, शिवसेनेचे जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र काळे,काँग्रेस पक्षाचे वैभव बुरुंगले,माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.