मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेश लोले असं महाराष्ट्र परिवहन विभागातील मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत होते. मुंबईतील परळ एसटी डेपोच्या जवळ ते बेशुद्धावस्थेत आढळले होते.त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सायन हाॅस्पिटलमध्ये लोले यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. लोले यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
एकीकडे मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे, मात्र लोले यांचा या आंदोलकांशी काही संबंध होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.महेश लोले मुंबईतील परळ एसटी डेपोच्या जवळ बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु सायन हाॅस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. महेश लोले यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
त्यांचा अपघात झाला,की उष्माघात किंवा तत्सम प्रकाराने त्यांचा बळी गेला,हे अजूनही निश्चित नाही. मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक परिसरातील निवासस्थानाबाहेरही काही कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल चढवला होता. मात्र लोले यांचा या आंदोलनाशी काही संबंध आहे की नाही, हे अजूनही समजलेलं नाही.