बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
मुंबईत आज एसटी कर्मचाऱ्यांच्या रागाचा बांध फुटला असून,आज १०० ते १५० एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक मुंबईतील शरद पवार यांच्या सिव्हर ओक या निवासस्थासमोर दगडफेक आणि चप्पल फेक करत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
दुपारी अचानकपणे हा एसटी कर्मचाऱ्यांचा जमाव शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक घरावर धडकला असून, त्यावेळी त्याठिकाणी केवळ दोन पोलिस कर्मचारी होते.ते या आंदोलकांना आवरू शकले नसल्याने,या कर्मचाऱ्यांनी जवळपास अर्धा तास याठिकाणी गोंधळ घातला.यावेळीच शरद पवारांच्या बंगल्यावर चप्पलफेक आणि दगडही फेकण्यात आले.
आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या बारामतीमधील
गोविंदबाग या निवासस्थानी कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मात्र वाढवण्यात आला आहे.