Political News : मनसेच्या शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती झाल्यानंतर वसंत मोरे यांनी केलं हे ट्वीट..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आपल्याला अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं.यावर वसंत मोरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे.वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं अभिनंदन केलं आहे. “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!”असं ट्वीट वसंत मोरे यांनी केलं आहे. 

पुणे मनसेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज (७ एप्रिल) मुंबईत बोलावलं होतं.राज ठाकरेंच्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलं नव्हतं.अखेर वसंत मोरे यांची पुणे मनसेच्या शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. 

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा’, असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *