पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर,मनसेचे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी घेतलेली वेगळी भूमिका आणि विविध पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अशा वेगवान घडामोडी सध्या घडत आहेत. त्यात वसंत मोरेंवर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू असून, त्यांना पदावरून हटवले. राज ठाकरे यांच्या आदेशानं नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यपदी निवड करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षाच्या पदावरुन हटवल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वसंत मोरे हे पक्षाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून ही बाहेर पडले आहेत. आज राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना बोलावलं होतं.पण वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ९ एप्रिलला ठाण्यात सभा होणार आहे.त्यामध्ये राज ठाकरे या मुद्द्यावर पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात आहे.