महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
एक लाखांचे दरमहा १० टक्के व्याजाने पैसे घेत,त्याच्या व्याजाची रक्कम तब्बल दोन लाख ऐंशी हजार देऊनही, व्याजाचे अजून दोन लाख दे,पैसे देता येत नसतील तर चार गुंठे जागा आमच्या नावावर करून दे असे म्हणत शिवीगाळ करत कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकार गणेश बाळासो खुरंगे आणि मधुकर गुलाबराव माळवे दोघेही ( रा.राजुरी,ता. फलटण,जि.सातारा ) या दोघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ५०४,५०६,३४ सावकारी अधिनियम चे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी गणेश शंकर काळे,वय.२७ वर्षे ( रा.राजुरी,ता.फलटण,जि.सातारा ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादीनी आणि त्यांचे मयत असलेले चुलते ईश्वर काळे यांनी संशयित आरोपी खासगी सावकार गणेश खुरंगे यांच्याकडून दहा टक्के व्याजाने बेकायदेशीरित्या एक लाख रुपये घेतले होते.त्याच्या मोबदल्यात फिर्यादीनी खासगी सावकाराला फेब्रुवारी २०२० ते ९ जून २०२१ पर्यंत वेळोवेळी व्याजाचे तब्बल दोन लाख ऐंशी लाख हजार दिले तरीही आरोपी खुरंगे यांनी व त्याचा नातेवाईक असलेले दुसरा संशयित आरोपी डॉ.मधुकर माळवे यांनी फिर्यादीला व्याजाचे आणखी दोन लाख दे असे म्हणत फिर्यादींच्या दुकानात जात शिवीगाळ व कुटुंबियातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी केली.
१५ दिवसानंतर पुन्हा आरोपी माळवे आणि खुरंगे फिर्यादींच्या दुकानात जात दोन लाख दे,अन्यथा तुझी चार गुंठे जमीन आमच्या नावावर करून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. दोघेही प्रतिष्ठित असल्याने फिर्यादीं तक्रार देत नव्हता असे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सागर अरगडे हे करीत आहेत.