मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बुधवारी ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. पण देशमुखांना दिल्लीला घेऊन जाण्यास न्यायालयाने सीबीआयला मनाई केली आहे. त्यामुळे देशमुखांची दिल्लीवारी सध्यातरी टळली आहे.देशमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीनंतरच त्यांना दिल्लीला घेऊन जाता येईल, असं न्यायालयानं सीबीआयला बजावलं आहे.देशमुख यांनी मनी लाँर्डिंगप्रकरणात अटक केली होती.आता त्यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावणी आहे. देशमुखांच्या खांद्याला दुखापत झाल्याने जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना सीबीआयने आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेत कोठडीसाठी विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं. सीबीआयचे वकील राज मोहन चांद यांनी देशमुखांना १० दिवसलांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. पोलीस बदली व पोस्टींग प्रकरणात ४ कोटी ६० लाख रुपयांची लाच घेतल्याचे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची परवानगी देण्याची मागणी केली.
दिल्लीला नेण्याची काय आवश्यकता आहे,असं न्यायालयाने विचारल्यानंतर चांद म्हणाले,’सीबीआयचा संपूर्ण सेटअप दिल्लीत आहे. तिथेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शास्त्रीय चौकशी तंत्र दिल्लीतच आहे. आरोपीला चौकशीचं ठिकाण ठरवण्याचा अधिकार नाही.’ देशमुख यांच्यावतीने अॅड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी देशमुखांना दिल्लीला नेण्याची गरज नसल्याचे सांगितले.
सीबीआयने त्यांची मुंबईतील कार्यालयात दोनदा तर अनेकदा तुरूंगात चौकशी केली आहे. त्यांना अनेक आजार आहेत.त्यांचं वय ७३ असून एवढ्या लांबचा प्रवास करू शकत नाहीत. त्यांचा खांदा निखळला असून त्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे. सीबीआय यांना आर्थर रोज तुरूंगातही चौकशी करू शकते. त्यांना कोठडीची गरज का आहे, असा प्रश्न उपस्थित करत निकम यांनी कोठडीला विरोध केला.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने देशमुखांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.