Big Breaking : पुण्यात बोगस गुंठेवारी दस्त नोंदणीचं सरकारी अधिकाऱ्यांचे रॅकेट उघड; बारामतीत देखील असेच प्रकार सुरू असल्याच्या चर्चेला उधाण..!!


यात ४४ अधिकाऱ्यांचे निलंबन,विभागीय चौकशी..!!

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बोगस गुंठेवारी दस्तनोंदणीचं रॅकेट पुण्यात उघड झाले आहे.एक मराठी न्यूज चॅनेल ने या गुंठेवारी दस्तनोंदणी रॅकेटला वाचा फोडली होती.त्यानंतर चौकशी झाली आणि त्यात अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल १० हजार बोगस दस्त नोंदणी झाल्याचं उघड झाले आहे.या दस्तनोंदणीद्वारे कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. राज्यातल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील ४४ अधिकाऱ्यांवर नोंदणी महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबन आणि विभागीय चौकशीची कारवाई केली. 

सरकारने बंदी घातल्यानंतर आणि गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते.तरीही एकट्या पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल ४४ दुय्यम निबंधक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने १० हजार ५६१ बोगस गुंठेवारीच्या दस्त्यांची नोंदणी केली आहे.४०० हून अधिक गुंठेवारीचे दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकांना त्वरीत निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

दरम्यान,त्याआधी आणखी एक घोटाळा उघड झाला आहे.फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासूनच रजिस्ट्रेशन केले जाते.मात्र पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलाल आणि सरकारी बाबूंनी केलेल्या या बोगस दस्त नोंदणीचा भांडाफोड मात्र झाला आहे.बारामतीत देखील असे प्रकार जोरात सुरू असल्याच्या चर्चा देखील सुरू असून,बारामतीत देखील अशा अधिकाऱ्यांना दणका बसणार का ? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *