बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील रणगाव येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपीना ताब्यात घेण्यास वालचंदनगर पोलिसांना यश आले असून,याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून संशयित आरोपी होमराज उर्फ होम्या उध्दव काळे, वय.४० वर्षे ( रा.वाकी शिवार,ता.आष्टी,जि. बीड ) अजय उर्फ आभ्या सुभाष भोसले,वय.२३ वर्षे, सचिन उर्फ आसी सुभाष भोसले,वय.२४ वर्षे,अविनाश उर्फ आवी उर्फ महींद्रा सुभाष भोसले, वय.२२ वर्षे सर्व (रा.माहीजळगाव ता.कर्जत,जि.अहमदनगर ) व राहुल उर्फ काळ्या पटु भोसले वय.२८ वर्षे ( रा.वाकुन,पारगाव, ता.पाथर्डी,जि.अहमदनगर ) या पाच जणांना सातारा मध्यवर्ती जिल्हा कारागृह येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३९५, ३९७ हा गुन्हा दाखल आहे.या दरोड्यात तब्बल साडे सहा लाखांचा ऐवज आरोपींनी लुटला होता.
याबाबत वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,रणगांव येथील कर्मयोगी कारखान्याच्या माजी संचालकाच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी २७डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री १ ते दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकला होता.याप्रकरणी सुनंदा राजेंद्र गायकवाड यांनी फिर्याद दिली होती,त्यानुसार अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण यांचे मदतीने तपास करून सदर गुन्हयातील पाच आरोपींची नांवे निष्पन्न झाली असून,आरोपींना सातारा जिल्हा कारागृह येथुन ताब्यात घेण्यात आले असून,त्यांना इंदापूर कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संशयित आरोपी हे वडूज न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीत होते.वालचंदनगर पोलीसांना दरोड्याचा गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील तपासासाठी ०४ एप्रिल रोजी अटक केली आहे.आरोपींकडून पोलिसांना अद्याप कोणताही मुद्देमाल मिळालेला नसून या गुन्ह्याचा तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते,बारामती विभाग पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेली आहे.