बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाराष्ट्र मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी आणि बारामतीतील गोरक्षक ऋषीकेश देवकाते यांच्या सतर्कमुळे बारामती तालुक्यातील निरावागज जवळील झांबरे वस्ती येथून कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई केली असून,याप्रकरणी गाडी चालक सतीश बबन होळकर ( रा.सोमंथळी,ता.फलटण,जि. सातारा ) व मालक महंमद सलीम कुरेशी ( रा.फलटण, जि.सातारा ) वाजीद कुरेशी ( रा.कुरेशीनगर, बारामती, जि.पुणे ) यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (a),(d),(e),महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ६,९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षक ऋषीकेश प्रभाकर देवकाते ( रा.निरावागज,ता.बारामती,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोरक्षक ऋषीकेश देवकाते निरावागजहून दि.(४) बारामतीला जात असताना,पिक अप क्र.( एम.एच.११ बी.एल ७५२६ ) या गाडीत मागील हौद्यात लहान मोठी रेडके भरून कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार देवकाते हे हर्षद देवकाते,माधव गाडे,युवराज डाळ यांच्यासह दुचाकीवरून येत या वाहनाची ताडपत्री काढून पहिली असता,आतमध्ये दाटीवाटीने २३ रेडके कोंबून नेली जात असल्याचे आढळून आले.या जनावरांची बाजारी किंमत जवळपास दोन लाख दहा हजारांचा आसपास आहे.या जनावरांची खाण्या पिण्याची कोणतीही सोया करण्यात आलेली नव्हती.देवकाते यांनी ही बाब स्वामींना कळवली असता,त्यानुसार स्वामी यांनी तालुका पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.यातील संशयित आरोपी वाजीद कुरेशी यांने ही जनावरे अकलूज च्या बाजारातुन खरेदी करून बारामतीला कत्तलीसाठी आणल्याचे कबूल केले.पोलिसांनी जनावरांसह पिक अप ताब्यात घेतला आहे.ही जनावरे वाचवल्यानंतर मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी ही जनावरे वाचल्यानंतर त्यांची पुढील व्यवस्था केडगावच्या श्री बोरमलनाथ गोशाळेत केली आहे.
या कारवाई तब्बल साडे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून बापुराव देवकाते,हर्षद देवकाते,महादेव गाडे, रोहन बुरूंगले,युवराज डहाळे यांनी सहभाग घेतला.