Crime News : इंदापूर पोलीस “तू सी ग्रेट हो” अवघ्या चार तासांत दरोड्याचा लावला छडा…सिनेस्टाईल पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात..!!


इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी देवकर परिसरात काल सायंकाळी पडलेल्या दरोड्यातील आरोपींना इंदापूर पोलिसांनी फक्त अवघ्या काही तासात करमाळा तालुक्यातून सिनेस्टाईल पाटलाग करून गजाआड केले आहे.इंदापूर पोलीस सतत कोणत्या ना कोणत्या धडाकेबाज कारवाईने चर्चेत असतात.इंदापूर
पोलिसांनी अवैध धंद्यासह चोरी,दरोडे रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.

इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर इंदापूर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून कारवायांचा धडाका लावून इंदापूर पोलीस स्टेशनची कामगिरी मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.लोणी देवकर येथे दि.४ रोजी सायंकाळी पडलेल्या दरोड्यातील आरोपींना अवघ्या काही तासात गजाआड केल्याने इंदापूर पोलिसांच्या कामगिरीचे पुणे जिल्ह्यात कौतुक केले जात असून इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,व कर्मचारी यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *