पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पोल्ट्री व्यवसायिकाच्या कोंबड्या वाहून घेऊन जाणा-या टेम्पोला गाडी आडवी मारून टेम्पो ड्रायवरला मारहाण करत, कोयत्याचा धाक दाखवून टेम्पो हायजॅक करणाऱ्या संशयित आरोपी वैभव विद्याधर सरोदे उर्फ होगाडे ( चिखली,पुणे ),रॉकी मोंटू शेख ( रा.साने वस्ती, कॉर्नर ) आमिर ( चिकन दुकान नेवाळे वस्ती,चिखली, पुणे ) मूळ ( रा.मशीद बाग,केशरडाग, कलकत्ता ) सुखउद्दीन जलालूद्दीन शेख ( रा.सावरी चिकन सेंटर, नेवाळे वस्ती,चिखली पुणे ) देविदास संतोष काकडे (रा.नेवाळे वस्ती,चिखली,पुणे ) वैभव लक्ष्मण कांबळे रा.शरद नगर,चिखली,पुणे ) या पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात भा.द. वि कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोल्ट्री व्यवसायिकांचे कोंबड्या चोरीमुळे मोठे नुकसान झाल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केली असता,या गुन्ह्याचा तपास करीत असताना,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की,वैभव सरोदे याने हा गुन्हा पैश्याच्या गरजेपोटी त्याच्या साथीदारांसह कोंबडयांचा टेम्पो आणि त्यातील सुमारे १४४२ जिवंत कोंबडया तसेच फिर्यादी आणि क्लीनर यांचे मोबाईल फोन असा तब्बल साडे लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची माहिती मिळाली असता,गुन्हे शाखेने त्याला शरदनगर,चिखली येथून ताब्यात घेत त्याच्याकडे आधीक चौकशी केली असता,त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबुल केले.याप्रकरणी पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असून या
गुन्ह्याचा पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मितेश घट्टे,पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील,यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण,प्रकाश वाघमारे,पोलीस हवालदार राजू मोमीन,चंद्रकांत जाधव, पोलीस नाईक अमोल शेडगे,पोलीस कर्मचारी धीरज जाधव,प्राण येवले,दगडू विरकर, महिला पोलीस कर्मचारी पूनम गुंड यांच्या पथकाने केलेली आहे.