बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीच्या चंदूकाका सराफ ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अज्ञात महिलांनी आणि अज्ञात एका इसमाने तब्बल ७२.६ ग्रॅमचा सोन्याचा गंठण पाहण्यासाठी घेत नकळत लंपास केला असून,या सोन्याच्या गंठणची किंमत बाजारी भावानुसार किंमत तब्बल साडे चार लाखांच्या आसपास असून अज्ञात चोरट्यांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दुकानातील महिला कर्मचारी कल्पना चैतन्य भागवत (रा.गोकूळवाडी,जुनी कचेरी समोर,बारामती ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,पाडव्याच्या दिवशी चंदुकाका सराफ ज्वेलर्स या दुकानात काही महिला या सोने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.त्यानुसार फिर्यादींनी या महिलांना त्यांच्या मागणीवरून सोन्याचे पाच गंठण दाखवले असता,एक गंठण पसंत झाल्याने त्यांनी तो खरेदी केला,त्या गर्दीत दोन महिला व एका इसम येत, त्यातील एका महिलेने फिर्यादींच्या नकळतपणे एक गंठण घेऊन तिच्या पाठीमागे उभा राहिलेला महिलेकडे देत लंपास केला.
व दुसऱ्या महिलेकडे पाहून गंठण पसंद नाही असे म्हणत आमच्याकडे डिझाइन आहे ते बनवून द्या असे म्हणत आमचे पाहुणे येईपर्यंत आम्ही बाजूला थांबतो असे म्हणत ते तिघेजण निघून गेले,मात्र हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून,त्यावरून ही फिर्याद फिर्यादींनी दिली आहे असे फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.